
लॉकडाऊनमध्ये मिळालेल्या मोकळ्या वेळेचा सदुपयोग करत सुरतमधील एका कलाकाराने सुपारींपासून सुंदर कलाकृती तयार केल्या आहेत. पवन शर्मा असे या कलाकाराचे नाव आहे. सुपारीचा आकार लहान असल्याने त्या कोरून त्यापासून कलाकृती तयार करणे हा तसा अवघडच टास्क. मात्र या कलाकाराने लॉकडाऊनच्या काळात सुपारींपासून तब्बल 60 कलाकृती तयार केल्या आहेत. यात भगवान श्री गणेश, पाण्याचे भांडे, राम मंदिर आदींचा समावेश आहे. याशिवाय हिंदी आणि इंग्रजी अक्षरांचा वापर करूनदेखील काही कलाकृती त्यांनी साकारल्या आहेत. नक्षीकामासाठी आता त्यांना तीन तासांऐवजी 15 मिनिटे लागतात.



























































