
गुजरातमधील वडोदरा शहरातील कापुराई येथील राष्ट्रीय महामार्गावर एक लक्झरी बस व ट्रकची धडक झाली. या अपघातात सहा जण ठार तर 15 जण जखमी झाले आहेत. मंगळवारी पहाटे चारच्या सुमारास हा अपघात घडला.
अपघातग्रस्त बस ही राजस्थानवरून सुरतच्या दिशेने जात होती. महामार्गावर ट्रक हा बसच्या पुढे होता. त्या ट्रकला ओव्हरटेक करायचा प्रयत्न करत असताना बसने ट्रकला धडक दिली. या अपघातात सहा जण ठार झाले तर 15 जण जखमी झाले. जखमींना स्थानिक एसएसजी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृतांमध्ये एक बालक, एक महिला व चार पुरुषांचा समावेश आहे.


























































