Gujrat Lion Video – गुजरातमधील फ़ाईव्ह स्टार हॉटेलमध्ये शिरला सिंह

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गुजरातमधील फ़ाइव्ह स्टार हॉटेलमध्ये एक सिंह शिरला आणि एकच खळबळ उडाली. त्याचे काही व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.


गुजरातच्या जुनागढमधील सरोवर पोर्टिको हॉटेलमध्ये एक सिंह शिरला. वेळ रात्रीची असल्याने फार रहदारी नव्हती. हा सिंह उडी मारून हॉटेलमध्ये शिरला आणि हॉटेलच्या परिसरात फिरला. काही वेळानंतर आलेल्या वाटेने हा सिंह परत गेला. दरम्यान सीसीटीव्ही कॅमेर्‍यात ही घटना कैद झाली आणि त्याचे व्हिडीओही व्हायरल होत आहे. केबिन मधल्या सुरक्षा रक्षकाने या सिंहाला पाहिले आणि घाबरून गेला. दरम्यान ही बाब फार सामान्य असल्याचे एका सोशल मीडिया युजरने म्हटले आहे.