गुलाम नबी आझाद यांना जम्मू विमानतळावर रोखले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांना आज जम्मू विमानतळावरच रोखण्यात आले. त्यांची रवानगी पुन्हा दिल्लीला करण्यात आली. आझाद यांना महीना भरात दुसऱ्यांदा अशाप्रकारे रोखण्यात आले आहे. याआधी देखील जम्मू कश्मीरमधून कलम 370 हटविल्यानंतर ते राज्यात परतत असताना त्यांना जम्मू विमानतळावर रोखण्यात आले होते व पुन्हा दिल्लीला पाठवण्यात आलेले.

आझाद दिल्लीवरून सोमवारी रात्री पावणेतीनच्या सुमारास जम्मू विमानतळावर पोहचताच त्यांना रोखले आणि पहाटे 4 वाजता त्यांची रवानगी पुन्हा दिल्लीला करण्यात आली. अशी माहिती काँग्रेसचे प्रवत्ते रवींद्र शर्मा यांनी दिली.