कश्मीरची परिस्थिती वाईट – गुलाम नबी आझाद

314

मी आतापर्यंत कश्मीरमध्ये जेवढा फिरलोय ते पाहून कश्मीरची परिस्थिती वाईट आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार गुलाम नबी आझाद यांनी दिली आहे. कश्मीरमधून 370 कलम हटवल्यानंतर घालण्यात आलेल्या निर्बंधांमुळे आझाद यांना कश्मीरमध्ये जाता येत नव्हते. सर्वोच्च न्यायालयात याचिका केल्यामुळे त्यांना सहा दिवसांची परवानगी दिली. कश्मीरमधील त्यांच्या कुटुंबीय आणि नातेवाईकांची भेट घेतल्यानंतर मंगळवारी ते जम्मूत आले. त्यावेळी पत्रकारांच्या प्रश्नावर पहिल्यांदा प्रतिक्रिया दिली. ‘न्यायालयाने मीडियाशी बोलायला बंदी घातल्यामुळे आता दिल्लीत परतल्यावरच मला जे बोलायचे आहे ते बोलेन,’ असे सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या