काव्यरसग्रहण – आत्मसंयम योग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 

>>गुरुनाथ तेंडुलकर

लहानपणी आम्हाला शाळेच्या पुस्तकात भानुदास नावाच्या कवीची एक कविता होती…

पडू आजारी मौज हीच वाटे भारी… 

नकोच जाणे मग शाळेला 

काम कुणी सांगे ना मजला 

मऊ मऊ गादी निजावयाला, 

चैनच सारी… मौज हीच वाटे भारी 

मिळेल सांजा साबुदाणा 

खडीसाखर, मनुका, बेदाणा 

संत्री, साखरलिंबू आणा 

जा बाजारी… मौज हीच वाटे भारी 

शाळकरी वयात आम्ही मुलं फारशी आजारी पडत नसू. त्यामुळे कधीतरी क्वचितच येणाऱया आजारपणाचं खूप कौतुक वाटायचं. अगदी साधं सर्दीपडसं झालं तरी आईवडिलांचा जीव टांगणीला लागायचा आणि त्यामुळे अधिकच लाड व्हायचे. आपल्यापैकी बहुतेकांनी लहानपणीच्या छोटय़ा मोठय़ा आजारपणातली गंमत अनुभवली असेलच. पण पुढे पुढे वय वाढलं आणि समज येऊ लागल्यानंतर मात्र कोणत्याही प्रकारचं आजारपण नकोसं वाटतं. प्रौढ वयात तर आजारपण नकोच नको, पण आपल्याला नको असलं तरी आजारपण म्हणजे काही मोबाइल नव्हे की, नको असणाऱया माणसांचे नंबर ब्लॉक केले की, त्यांचे कॉल येणारच नाहीत. आजारपण ही अशी गोष्ट आहे की, जी आपल्याला नको असली तरीही ती येतेच. अनेक आजारांचं महत्त्वाचं कारण म्हणजे आपली बदलती जीवनशैली, अनियमित दिनचर्या, अपुरी झोप आणि अयोग्य आहार.

योग्य आहाराबद्दल अनेक वर्तमानपत्रांतून, मासिकांतून आणि अलीकडे व्हॉटस्अॅपसारख्या सोशल मीडियातून अनेक तज्ञ मंडळी वेळोवेळी सल्ले देत असतात. त्या सगळ्या लेखांचा लघुतम साधारण विभाजक (लसावि) काढला तर बहुतेक सर्व आहार तज्ञ तीन पदार्थ जेवणातून वर्ज्य करायला सांगतात. ते पदार्थ म्हणजे मैदा, रिफाइंड मीठ आणि साखर. हे ठाऊक असूनही आपण ते खातो. आजार आले की, त्यांच्यावर उपाय म्हणून औषधं घेतली जातात. त्या औषधांचे दुष्परिणाम म्हणून पुन्हा वेगवेगळे आजार होतात आणि पुन्हा त्यावर औषधं घ्यावी लागतात. असं हे दुष्टपा सुरू होतं.

आजच्या आपल्या कवितेचं शीर्षक आहे ‘औषधं’ आणि कवयित्री आहेत नागपूर येथील मेघना वसंत वाहोकर. मेघनाताई स्वत विदर्भ मराठवाडा साहित्य संघात सािढय कार्यरत आहेत. तसंच त्या अनेक सामाजिक संस्थांशी निगडित आहेत. अनेक अनुभव गाठीशी असलेल्या मेघनाताई लिहितात…

कसं झालं न पहा आता 

कपाटाच्या या खणात आधी खाद्य पदार्थ मिष्टान्न असायचे  

लहानमोठय़ा बरण्यांमध्ये आता औषधं 

अंगावरच्या दुखण्यावरचे… 

कपाटातल्या बरण्यांतून ठेवलेले सटरफटर खाद्य पदार्थ, फरसाण, मिठाया आणि गोडाधोडाचे पदार्थ जाता येता तोंडात टाकलं तर दुसरं काय होणार हो? कवयित्री मेघनाताईंनी या कवितेत पुढे औषधांपासून सुटका मिळवण्याचाही उपाय सांगितला आहे.

औषधं कमी व्हावीत म्हणून मेघनाताईंनी किती सुंदर उपाय सांगितलाय या कवितेत नाही का? आपण निसर्गाच्या जेवढे जवळ जाऊ तेवढं आपलं आयुष्य अधिकाधिक निरामय होईल. जेवढा आपला आहार नैसर्गिक आणि साधा असेल तेवढे आपण कमी आजारी पडू. आपलं मन अधिकाधिक प्रसन्न राखलं तर अनेक मानसिक विकार आणि त्याच्या अनुषंगाने उद्भवणाऱया शारीरिक व्याधी टाळता येतील.

भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीतेच्या सहाव्या अध्यायातील सतराव्या श्लोकात हेच तर सांगितलंय…

युक्ताहार विहारस्य 

युक्त चेष्टस्य कर्मसु । 

युक्त स्वप्न अवबोधस्य  

योगो भवति दुःखहा ।। 

भावार्थ : योग्य प्रकारचा आहार-विहार करणाऱयाला तसेच कर्म साध्य होण्यासाठी यथायोग्य प्रयत्न करणाऱयाला, त्याचबरोबर योग्य प्रमाणात निद्रा आणि जागृती सेवन करणाऱया माणसाला सर्व दुःखांचा नाश करणारा योग प्राप्त होतो. अशा प्रकारचं प्रमाणबद्ध आयुष्य जगणाऱया माणसाला केवळ आजारपणच नव्हे, तर वार्धक्यदेखील लांब ठेवणं सहज शक्य असतं, पण त्यासाठी आवश्यक असतो तो आत्मसंयम.

भगवद्गीतेतील वर उल्लेखिलेला श्लोक ज्या सहाव्या अध्यायात आहे, त्या अध्यायाचं नाव आहे आत्मसंयम योग.

औषधं 

कसं झालं न पहा आता 

कपाटाच्या या खणात आधी  

खाद्य पदार्थ मिष्टान्न असायचे  

लहानमोठय़ा बरण्यांमध्ये 

आता औषधं 

अंगावरच्या दुखण्यावरचे… 

कळलंच नाही कधी आलीत  

ही घरात हसत खेळत 

आता नुसती रुसून बसली असतात हट्टी मुलासारखी 

कधी जातील ही परत लाघट 

माझं घर सोडून? 

मी जाते मोठय़ा बगिचात,  

हसते, खेळते, गाते, नाचत असते  

झाडं, पानं, फुलांना गोंजारत  

कोवळ्या उन्हात न्हात  

चिवचिव पाखरांना साद घालत  

जुळवत असते गाणे  

नव्या आयुष्याचे 

औषधांना हे कळत नसेल का? 

मी गाणे बदलले ते ? 

बसा रुसून त्या कपाटात… 

बसा ना…