हडपसर परिसरात कॅनलमध्ये मृतदेह सापडला, खून झाल्याचा पोलिसांचा संशय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
file photo

हडपसर परिसरात बी.टी. कवडे रोड परिसरातील कॅनलमध्ये एका 45 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह सोमवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास मिळून आला. राहूल लेणे (वय 45) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. अंगावर असलेल्या जखमामुळे त्यांचा खून झाला असल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. याप्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

राहूल लेणे हे वैद्युवाडी येथील एका खासगी कंपनीत कामाला होते. ते कुटुंबीयांपासून वेगळे राहत होते. काही दिवसापूर्वी त्यांना औंध येथील एका व्यसनमुक्त केंद्रात दाखल करण्यात आले होते. तेथून ते धायरी परिसरात वास्तव्यास गेले होते. आर्थिक व्यवहारातून कंपनीतील नोकरीचा नुकताच त्यांनी राजीनामा दिला होता.

सोमवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास एकाचा मृतदेह कॅनलमध्ये आढळून आला. ही माहिती स्थानिकानी हडपसर पोलिसांना दिली. त्यानंतर अग्निशमन दल व पोलिसांनी मृतदेह बाहेर काढला. त्यावेळी तो लेणे यांचा असल्याचे उघडकीस आले. लेणे यांच्या मृतदेहावर जखमा असल्यामुळे त्यांची हत्या की आत्महत्या याबाबत पोलिसांना संशय आहे.