Hair Care- काळ्याभोर चमकदार केसांसाठी फक्त पाच रुपये करा खर्च! या घरगुती उपायांनी केस होतील घनदाट

सध्याच्या आपल्या धावपळीच्या लाइफस्टाइलमुळे केस अतिशय खराब होऊ लागले आहेत. केस कोरडे निस्तेज होणं त्याचबरोबरीने केस अकाली पांढरे होण्याची समस्याही खूप वाढत आहे. आपल्या केसांमध्ये कोंडा होणं ही तर खूप काॅमन समस्या सध्या निर्माण झालेली आहे. कोंड्यामुळे केस गळण्याची समस्याही वाढू लागलेली आहे. म्हणूनच केसांच्या वाढीसाठी आपण काही घरगुती उपाय करु शकतो. केसांच्या वाढीसाठी जास्वंद फुलाला आयुर्वेदात खूप महत्त्व आहे. या फुलाच्या वापराने केस अकाली पांढरे होण्यास प्रतिबंध होतो. तसेच या फुलामुध्ये व्हिटॅमिन सी, फ्लेव्होनोइड्स, एमिनो अॅसिड, म्यूसिलेज फायबर, आर्द्रता आणि अँटीऑक्सिडंट्स असल्यामुळे केसांसाठी हे सर्व घटक महत्त्वाचे आहेत.

जास्वंदाचा हेअर मास्क कसा कराल?

 

जास्वंद आणि दही हेअर मास्क

3 ते 4 ताजी जास्वंद फुले नीट धुवून त्याची पेस्ट बनवावी. फुलांच्या पेस्टमध्ये 2-3 चमचे ताजे दही घाला आणि दोन्ही चांगले मिसळा. हे सर्व  केसांवर लावून चांगला मसाज करावा. एकदा पूर्ण झाल्यावर, आपले केस शॉवर कॅपने झाकून ठेवा आणि एक तास मिश्रण तसेच ठेवावे. त्यानंतर केस धुवावेत.

जास्वंदाचे फुल आणि त्याच्या पानांचा हेअर मास्क

याकरता 6 ते 8 ताजी लाल जास्वंदीची फुले घ्यावीत. यामध्ये काही जास्वंदीच्या झाडाची पानेही घ्यावीत. चांगले धुवून मिक्सरमधून पेस्ट तयार करा. ही पेस्ट केसांवर लावून हलक्या हाताने मसाज करा. सुमारे एक तास तसेच ठेवून द्यावे. त्यानंतर डोके धुवावे. निरोगी केसांसाठी तुम्ही आठवड्यातून दोनदा वापरू शकता. जास्वंद आणि नारळाचे तेल केसांसाठी अतिशय उपयुक्त आहे.

 

 

Hair Care- केसांच्या घनदाट वाढीसाठी ‘या’ तेलाने रोज पाच मिनिटे मालिश करा! केसांची वाढ बघून तुम्हीही आश्चर्यचकीत व्हाल

जास्वंद नारळ तेल हेअर मास्क कसा कराल?

6 ते 8 ताजी लाल जास्वंद आणि थोडी जास्वंदीची पाने घ्यावीत. सर्व नीट धुवून घ्यावे. बारीक करून एक पेस्ट बनवावी. यामध्ये थोडे खोबरेल तेल घालावे. ते एकत्र मिसळून मिश्रण केसांवर नीट लावावे. किमान 45 ते 60 मिनिटे तसेच ठेवावे. त्यानंतर सौम्य शैम्पू वापरून कोमट पाण्याने डोके धुवावे.

(कोणतेही उपाय करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)