
हँकॉक ब्रीजजवळील रस्ता रुंदीकरण कामात इमारती, गाळ्यांचा निर्णय रहिवासी-लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊनच केला जाणार असल्याचे आश्वासन पालिका प्रशासनाने दिले आहे. या कामांबाबत आज पालिका अधिकारी, रहिवासी आणि स्थानिक लोकप्रतिनिधींची महत्वपूर्ण बैठक पार पडली.
प्रभाग क्रमांक 210मधील हँकॉक ब्रिजच्या पुनर्बांधणीच्या माध्यमातून रस्ते रुंदीकरणामध्ये काही इमारती आणि रहिवासी गाळे आणि दुकाने हे बाधित होत असल्यामुळे, रहिवाशांमध्ये एक भीतीचे आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर भायखळ्याच्या आमदार यामिनी जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये स्थानिक नगरसेविका सोनम जामसुतकर, माजी नगरसेवक मनोज जामसुतकर यांच्या विशेष प्रयत्नाने भायखळा ई- वॉर्डचे सहाय्यक आयुक्त मकरंद दगडखेर, सहायक अभियंता (परिरक्षण) जगताप, सहायक अभियंता (ब्रिज), सहायक अभियंता (रोड) तसेच म्हाडाचे कार्यकारी अभियंता सावंत यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली.
यावेळी रहिवासी-लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन काम केले जाईल असे आश्वासन पालिका प्रशासनाकडून देण्यात आले.रहिवासी-लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन काम केले जाईल असे आश्वासन पालिका प्रशासनाकडून देण्यात आले. यावेळी भायखळा विधानसभा संघटक विजय लिपारे, उपविभाग प्रमुख राम सावंत, शाखाप्रमुख हेमंत मयेकर, शाखाप्रमुख हनिफ शेख आदी उपस्थित होते.


























































