कोरोनाबाबत ‘हा’ गैरसमज बाळगू नका, WHO ने दिला इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जगभरात पसरलेल्या जीवघेण्या कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. वेगवेगळ्या देशांमध्ये लसीवर संशोधन सुरू आहे, मात्र अद्यापही रामबाण उपाय सापडलेला नाही. कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात रोग प्रतिकारशक्ती वाढवण्याच्या (hard immunity) रणनीतीवर चर्चा झोडल्या गेल्या. मात्र जगातील आरोग्य संघटनेने (WHO) याबाबत चेतावणी दिली असून असा गैरसमज न पाळण्याचे आवाहन केले आहे.

रोग प्रतिकारशक्ती म्हणजे काय तर एखादा आजार आल्यास त्याविरोधात लढण्यासाठी बहुसंख्य लोकांच्या शरीरात अँटिबॉडी तयार होणे. अँटिबॉडी तयार झाल्यास आजार पसरण्याचा वेग मंदावेल असे सोपे गणित मांडण्यात आले. मात्र जागतिक आरोग्य संघटनेने हा गैरसमज असल्याचे म्हटले आहे.

संघटनेचे प्रमुख ट्रेडोस अधनोम यांनी एका ऑनलाईन पत्रकार परिषदेत याबाबत बोलताना म्हटले की, हार्ड इम्युनिटी गी एक संकल्पना आहे, ज्याचा वापर लसीकरणात होतो. यामुळे एखाद्या व्हायरस पासून बचाव होऊ शकतो. मात्र यामुळे सर्वकाही सुरळीत होईल असे नाही. यासाठी त्यांनी कांजण्या आणि पोलिओचे उदाहरण दिले. एकूण लोकसंख्येपैकी 95 टक्के जनतेला लस देण्यात आली तरच राहिलेल्या 5 टक्के लोकांना संक्रमणापासून वाचवले जाऊ शकते, असे ट्रेडोस अधनोम म्हणाले. हार्ड इम्युनिटी एखाद्या व्यक्तीला वाचवू शकते, मात्र तो इलाज असू शकत नाही हे इतिहासातील आजारांकडे पाहून लक्षात येते, असेही ते म्हणाले.