
सामना ऑनलाईन । प्रोव्हिडेन्स (गयाना)
हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील हिंदुस्थानी संघाने वेस्ट इंडीजमध्ये सुरु असलेल्या महिला टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत विजयाच्या चौकारासह उपांत्य फेरीत दिमाखात प्रकेश केला. अखेरच्या साखळी लढतीत बलाढ्य ऑस्ट्रेलियाला 48 धाकांनी धुळ चारून हिंदुस्थानी खेळाडूंनी आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी केली, अशी कौतुकाची थाप कर्णधार हरमनप्रीत कौरने लगावली.
विजयानंतर बोलताना हरमनप्रीत म्हणाली, ‘कॅरेबिन स्वारीवर आलेला हिंदुस्थानी संघ संतुलित आहे. जेव्हा तुम्ही चांगल्या संघासोबत खेळत असता तेव्हा आपसुकच तुमच्याकडून चांगली कामगिरी होते. ऑस्ट्रेलियाविरुद्ध आम्ही सर्वच आघाडय़ांवर सरस खेळ केला. विशेष म्हणजे क्षेत्ररक्षणातल्या चुकाही यावेळी टाळल्या. माझ्यात आणि स्मृती मानधनामध्ये झालेली भागीदारी यापुढेही अशीच सुरु राहील अशी आशा आहे. स्मृतीने 55 चेंडूत केलेली 83 धावांची खेळी काबिले तारिफ होती. वेदा कृष्णमृतीनेही मोक्याच्या वेळी डीआरएस घ्यायला लावला, तिचेही कौतुकच करायला हवे. बलाढ्य ऑस्ट्रेलियाला हरविल्याने मला माझ्या संघाचा अभिमान आहे,’ असेही हरमनप्रीन म्हणाली.
‘टीम इंडिया’ सातवे असमान पे!
हिंदुस्थानी महिला संघाने सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर टी-20 क्रिकेटमध्ये सलग सातव्या विजयाला गवसणी घातली. विश्वचषक स्पर्धेत साखळी फेरीत अजेय असलेल्या हिंदुस्थानी संघाने विजयाचा चौकार लगावत ‘ब’ गटातून अव्वल स्थान मिळविले. बलाढ्य ऑस्ट्रेलियाला हिंदुस्थानी महिलांनी विश्वचषक स्पर्धेत प्रथमच हरविण्याची किमया केली. हिंदुस्थानी महिला संघाने कागांरुना तब्बल 1023 दिवसांनंतर पराभूत करण्याचा पराक्रम केला, हे विशेष. स्मृती मानधना (83) व हरमनप्रीत कौर यांनी (43) आक्रमक खेळी करताना हिंदुस्थानला 8 बाद 167 धाकसंख्या उभारून दिली. प्रत्युत्तरादाखलऑस्ट्रेलियाला 9 बाद 119 धावा करता आल्या.





























































