मिस युनिव्हर्स हरनाझ संधूमध्ये झालेला बदल पाहून बसेल धक्का, या आजाराशी देतेय लढा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हरनाझ संधूने यंदाची मिस युनिव्हर्स स्पर्धा जिंकून तब्बल 21 वर्षानंतर हा किताब हिंदुस्थानात परत आणला. हरनाझने ती स्पर्धा जिंकल्यानंतर तिच्यावर कौतुकाचा वर्षाव झाला. हरनाझचे सौंदर्य, तिची फिगर तसेच तिचे बुद्धी चातुर्य याची मोठ्या प्रमाणात स्तुती झाली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Miss Universe (@missuniverse)

फिटनेस फ्रिक असलेली हरनाझ आतापर्यंत तिच्या फिगरकडे खूप लक्ष देत होती. मात्र मिस युनिव्हर्स स्पर्धा जिंकल्यानंतर अवघ्या तीन महिन्य़ातच हरनाझमध्ये धक्कादायक बदल झाला आहे. हरनाझचे वजन मोठ्या प्रमाणात वाढले असून त्यावरून तिला ट्रोल केले जात आहे.

हरनाझला ट्रोल करून नेटकरी खडे बोल सुनावत आहे. दरम्यान हरनाझने त्या ट्रोलर्सला सडेतोड उत्तर देत तिच्या वाढत्या वजनाचे कारण सांगितले आहे. ते ऐकून चाहत्यांना देखील धक्का बसला असून सर्व जण ती बरी व्हावी म्हणून प्रार्थना करत आहेत.

हरनाझला celiac हा आजार असून हा आजार आतड्यांशी संबंधित आहे. हरनाझने स्वत: एका पत्रकार परिषदेत याविषयी सांगितले आहे. ”मला सेलिअॅक हा आजार आहे. हा आजार म्हणजे ग्लुटेनची अॅलर्जी”, असे हरनाझने सांगितले.


सेलिअॅक हा आजार आतड्यांशी संबंधित असून त्यामुळे शरीरातील ग्लुटेन पचवले जात नाही. या आजारात बॉडी फॅट जमा करू लागते. त्यामुळे हा आजार असलेल्या व्यक्तीचे वजन वाढते.