
दापोली तालुक्यातील हर्णै बंदर येथे रविवारी मध्यरात्र रोजी सुमारे दीडच्या सुमारास परमेश्वरी मच्छिमारी नौका बुडाली. मालक महेश रघुवीर (रा.हर्णे) यांची नौका उभी असताना वाऱ्याचे प्रवाहाने पाण्यात ओढली गेली आणि त्यानंतर ती नौका बुडाली.
नौकेवर 2 तांडेल व 5 खलाशी असे एकुण 7 मच्छीमार होते. या नौकेचे सुमारे चाळीस लाख रूपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. बंदर अधिकारी आंणि पोलीस पुढील पंचनामा करित असून नौकेवरील सर्वजण सुरक्षित असल्याची माहिती दापोली पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांनी दिली आहे.
हर्णै बंदरातील आणखी एक मच्छिमार नौका बुडत होती. मात्र बुडणाऱ्या यानौकेला बाहेर काढण्यात यश आले असले तरी नौकेचे मोठे नुकसान झाले आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील हर्णै बंदरात रात्री अचानक आलेल्या वादळाने अनेक नौकांचे नुकसान झाले. हर्णै बंदरात जलसमाधी मिळालेल्या मच्छिमार नौकेचे तुकडे असे पाण्यावर तरंगत होते.






























































