राज्य नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धा, हर्षवर्धन यादवला सुवर्ण पदक

304

पुण्याच्या 14 वर्षीय हर्षवर्धन यादवने नाशिकचा अक्षय अष्टपुत्रे आणि पुण्याचाच विक्रांत घैसास यांना मागे टाकून 36व्या महाराष्ट्र राज्य नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत 25 मीटर रॅपिड फायर पिस्तूल प्रकारात ज्युनियर आणि खुल्या गटात सुवर्णपदक पटकाविले. मुंबईतील वरळी येथील महाराष्ट्र रायफल नेमबाजी संघटनेच्या रेंजवर ही स्पर्धा सुरू आहे.

रॅपिड फायर पिस्तूल प्रकारात 25 मीटर या अंतरावर 22 बोअरच्या पिस्तुलाने नेमबाजी करावी लागते. प्रत्येकी 8 सेकंदांतील पाच शॉट्सच्या 4 मालिका, प्रत्येकी 6 सेकंदांतील पाच शॉट्सच्या चार मालिका, प्रत्येकी 4 सेकंदांतील पाच शॉट्सच्या 4 मालिका अशी नेमबाजी केली जाते. अशा आव्हानात्मक स्थितीतही हर्षवर्धनने ही चमकदार कामगिरी करून दाखविली. पुरुष आणि ज्युनियर गटात हर्षवर्धनने 600 पैकी 568 गुणांसह ही प्रथम क्रमांकाची कामगिरी केली.

निकाल 25 मीटर रॅपिड फायर पिस्तूल

पुरुष गट ः 1) हर्षवर्धन यादव (568), 2) अक्षय अष्टपुत्रे (560), 3) विक्रांत घैसास (555) ज्युनियर ः 1) हर्षवर्धन यादव (568), 2) ऋषिकेश वैद्य (पुणे; 538), 3) यश चौधरी (525)

आपली प्रतिक्रिया द्या