
सामना ऑनलाईन । नाशिक
राज्य स्तरीय आदिवासी क्षेत्र आढावा समितीचे अध्यक्ष विवेक पंडित यांच्या पाहणी दौऱ्यात नाशिकमधील हरसुल ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर्स आणि र्मचाऱ्यांच्या निवासस्थानाचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असल्याचे निदर्शनास आले होते. या प्रकरणाची तत्काळ दाखल घेऊन विवेक पंडित यांनी संबंधित अधिकाऱ्यांना धारेवर धरून रखडलेली कामं एका आठवड्यात पूर्ण करण्याचे आदेश बजावले. तसेच याची अंमलबजावणी न झाल्यास जबाबदार अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. त्यामुळे 2 वर्षांपासून इमारत तयार होऊन देखील केवळ वीजजोडणी अभावी निवासस्थानापासून वंचित राहिलेल्या हरसुल ग्रामीण रुग्लयाच्या कर्मचाऱ्यांचा प्रश्न एका आठवड्यात सुटला आहे.





























































