विधानसभा २०१९ – कोण ‘सत्तेत’, कोण ‘विरोधकात’; वाचा एक्झिट पोल

2675

सोमवारी महाराष्ट्र आणि हरयाणा या दोन राज्यातील विधानसभा निवडणुकीचे मतदान पार पडले. महाराष्ट्रामध्ये 288 तर हरयाणामध्ये 90 जागांसाठी मतदान झाले. महाराष्ट्रामध्ये सायंकाळी सहापर्यंत सरासरी 60.5 टक्के, तर हरायाणामध्ये सरासरी 65 टक्के मतदान झाले. मतदान संपल्यानंतर अनेक संस्थांनी एक्झिट पोल (Exit pol) जारी केला आहे. जवळपास सर्वच एक्झिट पोलनुसार हरयाणामध्ये भारतीय जनता पक्ष पुन्हा एकदा सत्तेत येत असल्याचे दिसत आहे.

LIVE- राज्यात 6 वाजेपर्यंत सरासरी 60.5 टक्के मतदान

‘पोल ऑफ द पोल्स’च्या नुसार, हरयाणामध्ये भाजपला 70 तर काँग्रेस आघाडीला फक्त 12 जागा मिळण्याची शक्यता आहे, तर इतरांच्या खात्यात 8 जागा जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यासह ‘सीएनएन-न्यूज 18’ च्या एक्झिट पोलमध्ये भाजपला 75, तर काँग्रेसला 10 जागा मिळतील अशी शक्यता आहे. ‘टाईम्स नाऊ’च्या एक्झिट पोलनुसार भाजप 71, तर काँग्रेस 11 आणि इतर 8 जागांवर विजय मिळवणार अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. यासह ‘एबीपी-सी व्होटर’ने भाजप 72, काँग्रेस 8 आणि इतरांना 10 जागा दिल्या आहेत.

वाचा हरयाणातील एक्झिट पोल –

सीएनएन-न्यूज 18 –

भाजप +- 75
काँग्रेस +- 10

टाइम्स नाऊएक्झिट पोल –

भाजप +- 71
काँग्रेस+- 11
इतर- 08

एबीपी-सी वोटर –

भाजप + – 72
काँग्रेस+ – 08
इतर- 10

रिपब्लिक-जन की बात –

भाजप +- 52-63
काँग्रेस +- 15-19
जेजेपी – 5-9
इतर- 7-9

टीवी-9-सिसेरो –

भाजप +- 69
काँग्रेस+- 11
इतर – 10

‘रिपब्लिक-जन’ने मात्र भाजपला 52 ते 63 आणि काँग्रेसला 15 ते 19 जागा मिळतील असा एक्झिट पोल दिला आहे. तर ‘टीव्ही-9 सिसेरो’ एक्झिट पोलनुसार भाजपला 69, काँग्रेसला 11 आणि इतरांना 10 जागांवर विजय मिळेल असा अंदाज आहे. त्यामुळे जवळपास सर्वच संस्थांनी भाजपला बहुमत दिल्याचे दिसत आहे. यामुळे मनोहरलाल खट्टर सरकार पुन्हा एकदा हरयाणात कमळ फुलवण्यात यशस्वी ठरल्याचे दिसते.

आपली प्रतिक्रिया द्या