हरयाणाची युट्यूबर ज्योती मल्होत्राच्या लॅपटॉप, मोबाईलची तपासणी

पाकिस्तानसाठी हेरगिरी करण्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या हरयाणाची युट्यूबर ज्योती मल्होत्राच्या मोबाईल आणि लॅपटॉपमधील चॅटिंगची आज कसून तपासणी करण्यात आली. माबाईल आणि लॅपटॉपमधील डेटा डिलीट करण्यात आला होता. हा संपूर्ण डेटा रिकव्हर करण्यात आला. दरम्यान, ईडीने आज दिल्ली, एनसीआर, नोएडा, गाझियाबाद आणि मुंबईसह तब्बल 15 ठिकाणी धाडी टाकल्या. यात पीएमएलए, 2002 कायद्यांतर्गत जेपी इंफ्राटेक लिमिटेड आणि जयप्रकाश असोसिएट्स लिमिटेडच्या मनी लॉण्डरिंगप्रकरणी कसून चौकशी करण्यात आली.