चंद्रकांत पाटील यांचा जन्म हिमालयात जाण्यासाठीच!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चंद्रकांत पाटील हे उठसुठ हिमालयात जाण्याची भाषा करतात. त्यामुळे त्यांचा जन्म राजकारणासाठी नसून, हिमालयात जाण्यासाठीच असल्याची खरमरीत टीका ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी केली आहे.

आदमापूर येथे पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाचे महाआघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री सतेज पाटील, खासदार संजय मंडलिक, जिल्हाप्रमुख विजय देवणे, आमदार प्रकाश आबिटकर, ए. वाय. पाटील आदी उपस्थित होते.

मंत्री मुश्रीफ म्हणाले, ‘पदवीधर मतदारसंघातून यापूर्वी निवडून आलेले चंद्रकांत पाटील यांनी पदवीधरांच्या कोणत्याच समस्या आजपर्यंत सोडविल्या नाहीत.’ पदवीधरांचा नेहमी अपमान करण्याचेच काम त्यांनी केल्याची टीका मंत्री मुश्रीफ यांनी केली.