चंद्रकांत पाटील पंतप्रधान आहेत की कृषिमंत्री?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

केंद्र सरकारने लादलेल्या कृषी विधेयकाविरोधात दिल्लीतील कडाक्याच्या थंडीत 14 दिवसांपासून शेतकरी आंदोलन करत आहेत. या पार्श्वभूमीवर कृषी कायदा मागे घेणार नसल्याचे वक्तव्य करणारे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे काय देशाचे पंतप्रधान आहेत की कृषिमंत्री, असा सवाल करीत ते का आगीत तेल ओतत आहेत, असा टोला ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी चंद्रकांत पाटील यांना लगावला.

शेतकरी आंदोलनाबाबत आज ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ आणि पालकमंत्री सतेज पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली. मुश्रीफ म्हणाले, दिवसभर शेतातील माल काढून शेतकरी तो विकत बसणार नाही. शेतकरी आपला माल कुठेही विपू शकतात. यासाठी बाजार समित्या आवश्यक असल्याचे सांगून, शेतकऱयांच्या सुपीक जमिनी मोठय़ा उद्योगपतींच्या घशात घालण्यासाठीच केंद्र सरकारकडून हा कॉन्ट्रक्ट शेतीचा कायदा करण्यात आल्याचा थेट आरोपही त्यांनी केला.

शेतकरी आंदोलनाला पाठिंबा म्हणून ‘हिंदुस्थान बंद’मध्ये महाविकास आघाडी सहभागी असून, अत्यावश्यक सेवा वगळता, सर्वांनी कडकडीत बंद पाळून शेतकऱयांच्या पाठीशी ठाम राहावे, असे आवाहन पालकमंत्री सतेज पाटील यांनी केले.