हातकणंगले – खुनाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश, आरोपींना अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
murder-knife

हातकणंगलेनजीकच माणगाववाडी चिंदया पिर परिसरात झालेल्या सजित राज राघवेंद्र वय (47) याच्या खुनाचा छडा लावण्यात हातकणंगले पोलिसांना यश आले आहे. बुधवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास संशयित आरोपी करण सुरेश जाधव (20, रा. गोसावी गल्ली, कागल) व आकाश अशोक गोसावी (रा.लक्ष्मी माळ हातकणंगले) यांना अटक केली आहे.

या प्रकरणातील इतर एका आरोपीला कडेगाव जि. सांगली येथून ताब्यात घेण्यात आले. त्याची कसून चौकशी केल्यानंतर आणखी तिघांना चौकशीसाठी हातकणंगले पोलिसांनी ताब्यात घेतले असून अधिक तपास पो.नि. अशोक भवड हे करीत आहेत. याबाबत पोलिसांन कडून मिळालेली अधिक माहिती अशी की, मयत सजीत हा जवळपास 30 वर्ष हातकणंगले येथील लक्ष्मी औद्योगिक वसाहती मध्ये कामास होता. त्याने सुरेश जाधव याच्या भाऊजीकडून 10 हजार रुपये उसने घेतले होते. मयत सजित हा थोडे थोडे करून पैसे देत होता. कालातरांने ज्यांच्याकडून पैसे घेतले होते, ती व्यक्ती कॅन्सरनी मयत झाली. त्यानंतर उरलेल्या पैशासाठी मेहुणा करण जाधव याने सजित याच्याकडे तगादा लावला होता. त्यावरून वाद होऊन करण जाधव ने सजितच्या डोक्यात दगड घालून त्याचा खून केला. सदरची घटना मंगळवारी कोल्हापूर -सांगली राज्य मार्गावरील घोडावत कॉलेजच्या मागे माणगाववाडी येथे घडली होती.

दरम्यान, जयसिंगपूर विभागाचे विभागीय पोलीस अधिकारी किशोर काळे व हातकणंगले पोलीस निरिक्षक अशोक भवड यांनी आरोपीचा छडा लावण्यासाठी यंत्रणा सक्रिय केली. चोवीस तासांच्या आत संशयित आरोपीना पकडण्यात आले. या कारवाईमध्ये पोलीस उपनिरिक्षक, पो. कॉ. सचिन हाके, ए. ए. निकम, एस. व्ही. पाटील, गणपती पोवार, भुषण शेटे, एम. माने, संदिप तळेकर, पंकज कांबळे यांनी सहभाग घेतला.