
संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या नवनिर्वचीत हातकणंगले नगरपंचायत निवडणूकीचा निकाल जाहीर झाला आहे. पहिल्यांदाच झालेल्या या निवडणुकीत शिवसेनेने 7 जागांवर विजय मिळवत अव्वल स्थान पटकावले. तर नगराध्यक्षपदी काँग्रेसचे अरुण मधुसुधन जानवेकर हे 444 मतांनी विजयी झाले. भाजपा 5, काँग्रेस -राष्ट्रवादी 2 , अपक्ष 3 असे बलाबल असून मतदारांनी एकहाती सत्ता कुणाकडेच दिलेली नाही. त्यामुळे नगरपंचायतीत त्रिशंकू अवस्था निर्मान झाली आहे. मात्र, महाविकास आघाडीचा फॉर्म्यूला इथेही अमंलात येण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत सर्वच पक्षांनी आपली प्रतिष्ठा पणाला लागली होती.
प्रभागनिहाय विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे
- प्रभाग क्रमांक 1 रोहीनी गुरुदास खोत (मिळालेली मते 162)
- प्रभाग क्रमांक 2 राजू जयसिंगराव इंगवले -भाजपा ( मिळालेली मते 257)
- प्रभाग क्रमांक 3 पूजा उर्फ शुभदा प्रकाश स्वामी -शिवसेना ( मिळालेली मते 159 )
- प्रभाग क्रमांक 4 केतन बाबासो कांबळे -शिवसेना ( मिळालेली मते 273)
- प्रभाग क्रमांक 5 रणजित बिरु धनगर -शिवसेना ( मिळालेली मते 375)
- प्रभाग क्रमांक 6 मयूर राजाराम कोळी -भाजपा ( मिळालेली मते 167)
- प्रभाग क्रमांक 7 रमजान रसुल मुजावर -भाजपा (मिळालेली मते 145)
- प्रभाग क्रमांक 8 अरूंधती उमेश सुर्यवंशी -भाजपा (मिळालेली मते 118)
- प्रभाग क्रमांक 9 छाया चंद्रकांत पाटील – अपक्ष (मिळालेली मते 231)
- प्रभाग क्रमांक 10 फरिदा नूरमहमंद मुजावर -काँग्रेस ( मिळालेली मते 273)
- प्रभाग क्रमांक 11 दिनानाथ अशोक मोरे -भाजपा (मिळालेली मते 283)
- प्रभाग क्रमांक 12 प्राजक्ता प्रवीण उपाध्ये -शिवसेना ( मिळालेली मते 153)
- प्रभाग क्रमांक 13 अभिजीत प्रकाश लुगडे -ताराराणी आघाडी ( मिळालेली मते 182)
- प्रभाग क्रमांक 14 अलका जयसिंग कांबळे -शिवसेना ( मिळालेली मते 126)
- प्रभाग क्रमांक 15 कविता राहुल हातकणंगलेकर -शिवसेना ( मिळालेली मते 177)
- प्रभाग क्रमांक 16 सोनाबाई तानाजी इरकर -शिवसेना ( मिळालेली मते 148)
- प्रभाग क्रमांक 17 विजय वसंत खोत -राष्ट्रवादी ( मिळालेली मते 163)

























































