
सामना प्रतिनिधी । मुंबई
दक्षिण मुंबईतल्या काळबादेवी परिसरातील बेकायदा पार्किंगवर सीसीटीव्हीद्वारे लक्ष ठेवा असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने वाहतूक पोलिसांना दिले असून हा प्रयोग सुरू करू अशी माहिती राज्य सरकारने कोर्टाला दिली. याप्रकरणी राजकुमार शुक्ला यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली असून प्रभारी मुख्य न्यायमूर्ती नरेश पाटील आणि न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर बुधवारी याप्रकरणी सुनावणी घेण्यात आली.

























































