
सामना प्रतिनिधी । मुंबई
बुलेट ट्रेनसाठी जागा बळकावणाऱ्या नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने (एनएचआरसीएल) ठाण्यातील एका बांधकाम कंपनीला जमीन संपादनासाठी चक्क इमारतीचे काम थांबविण्याची नोटीस धाडल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यावरून हायकोर्टाने ‘एनएचआरसीएल’ला व ठाणे महापालिकेला धारेवर धरले. तसेच काम थांबविण्याची नोटीस का बजावली असे खडसावत आठवडाभरात उत्तर देण्याचे आदेश दिले.



























































