एचडीएफसी बँकेचा ग्राहकांना दिलासा

hdfc-bank

एचडीएफसी बँकेने आपल्या ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे. बँकेने कर्जाच्या व्याजदरात 30 बेसिस पॉइंट्सची कपात केली आहे. यामुळे सर्व कर्जदारांना याचा फायदा होईल. व्याजदराचा बदल 7 जुलैपासून लागू करण्यात आला आहे. याआधी बँकेचा एमसीएलआर 8.90 टक्के ते 9.10 टक्क्यांपर्यंत होता. परंतु, या बदलानंतर आता तो 8.60 ते 8.80 टक्क्यांपर्यंत झाला आहे.