
आरबीआयने रेपो रेटमध्ये कपात केल्यानंतर बँका ग्राहकांना दिलासा देत आहेत. एचडीएफसी बँक आणि बँक ऑफ बडोदा या दोन बँकांनी आपल्या कर्जाच्या व्याज दरात कपात केली आहे. यामुळे गृहकर्ज, वाहन कर्ज आणि पर्सनल लोन स्वस्त झाले आहे. तसेच ग्राहकांचा ईएमआयसुद्धा कमी होणार आहे. बँक ऑफ बदोडाने आपल्या रेपो लिंक्ड रेंडिंग रेटमध्ये 0.50 टक्के कपात केलीय, तर एचडीएफसीने आपल्या मार्जिनल कॉस्ट लेंडिंग रेटमध्ये 0.10 टक्क्यांपर्यंत कपात केली आहे.