
धनश्री वर्माने “राईज अँड फॉल” मध्ये युजवेंद्र चहलबद्दल आणखी एक धक्कादायक खुलासा केला आहे. तिने खुलासा केला की लग्नाच्या पहिल्याच वर्षात, दुसऱ्या महिन्यात तिला माहित होते की युजवेंद्रसोबतचे तिचे लग्न टिकणार नाही. क्रिकेटर युजवेंद्र चहलची पूर्वाश्रमीची पत्नी आणि कोरिओग्राफर धनश्री वर्मा सध्या “राईज अँड फॉल” या रिअॅलिटी शोमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी होत आहे. हा शो अश्नीर ग्रोव्हर होस्ट करत आहेत. शेवटच्या भागात त्याने युजवेंद्रबद्दल आणखी एक धक्कादायक खुलासा केला. धनश्रीने दावा केला की, तिने लग्नाच्या फक्त दोन महिन्यांनंतर त्याला फसवणूक करताना रंगेहाथ पकडले.
युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांचा घटस्फोट, लग्नाच्या चार वर्षानंतर तुटलं नातं
“राईज अँड फॉल” च्या शेवटच्या भागात कुब्रा सैट आणि धनश्री जेवणाच्या टेबलावर बसून नाश्ता करताना दिसतात. यादरम्यान कुब्राने धनश्रीला विचारले की तिला पहिल्यांदा कधी कळले की, युजवेंद्रसोबत तुझे लग्न टिकणार नाही. त्यावर धनश्रीने म्हटले की, लग्नानंतर दुसऱ्या महिन्यातच मला हे कळले होते की, हे लग्न टिकणार नाही.
धनश्री वर्माने यापूर्वी शोमध्ये युजवेंद्र चहलसोबत घटस्फोट झाल्याचा खुलासा केला होता. तिने सांगितले होते की पोटगीचे वृत्त खोटे होते. त्या केवळ अफवा होत्या. धनश्री म्हणाली, “आमचे लग्न केवळ चार वर्षे टिकले. आम्ही ६-७ महिने डेट करत होतो.” युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा २०२० च्या लॉकडाऊन दरम्यान ऑनलाइन डान्स क्लासेसद्वारे भेटले. डिसेंबर २०२० मध्ये त्यांनी गुडगावमध्ये लग्न केले. फेब्रुवारी २०२५ मध्ये त्यांनी परस्पर संमतीने घटस्फोट घेतला.