
माणूस हा एक वेळ काही काळ अन्नाशिवाय जिवंत राहू शकतो, मात्र पाण्याशिवाय जिवंत राहणे अशक्य आहे. म्हणूनच तर पाण्याला जीवन म्हणतात. पाणी हे पुरेशा प्रमाणात आपल्या शरीरात जायला हवे. पुरेशा प्रमाणात पाणी न प्यायल्यास शरीरावर मोठा परिणाम होऊ शकतो. आज आपण याच बद्दल अधिक माहिती जाणून घेणार आहोत.
पाणी किती प्रमाणात पिणे गरजेचे असते, याबाबत अनेकांना पुरेशी माहिती नसते. युरिन आणि घामाद्वारे आपल्या शरीरातील पाणी बाहेर रोजच उत्सर्जित होत असते. त्यामुळे शरीरातील पाण्याचा समतोल कायम राखण्यासाठी स्वच्छ आणि पुरेसे पाणी पिणे अत्यंत आवश्यक असते.
मध्यम वय असलेल्या व्यक्तींचे पाणी कमी पिण्याचे प्रमाण कमी असल्यास त्याचा परिणाम उतारवयात सांधेदुखी, सूज या रूपात दिसतो. तसेच, जखमा होण्याची शक्यता कैकपटीने वाढते.
पाणी कमी पिण्यामुळे वाढत्या वयाच्या खुणा लवकर दिसू लागतात. सुरकुत्या लवकर येतात. त्वचेची चमक निघून जाते आणि ती सैल पडू लागते. शरीरात पाण्याची कमतरता असेल तर मेटाबॉलिजमची प्रक्रिया नीट होत नाही आणि शरीरात फॅट जमण्यास सुरुवात होते. पाण्यातून त्वचेला मॉश्चरायझर मिळत असते. पाणी पिल्याने त्वचा हायड्रेट राहते. मात्र कमी पाण्यामुळे त्वचेचा ओलसरपणा कमी होतो. कोरा (quora) या प्रश्न उत्तरांच्या एका संकेतस्थळावर विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देत असताना संकेत यांनी ही माहिती दिली.




























































