कोरोना काळातील सर्वांसाठी आरोग्य सूचना

  • घरी पोहोचण्याच्या पाच मिनिटे आधी गरम पाण्याची बादली दाराबाहेर आणून ठेवण्याची व्यवस्था करावी. दाराच्या आत गेल्या गेल्या अंगावरचे कपडे, रुमाल ते त्या पाण्यात भिजवावे.
  • हातातील पिशवी, पर्स, घडय़ाळ, पेन यावर सॅनिटायझर शिंपडावे, तर साखळी, अंगठी या प्रकारच्या वस्तू साबणाच्या पाण्याने धुऊन टाकाव्यात.
  • गरम पाण्यात थोडे डेटॉल टाकून स्वच्छ आंघोळ करा.
  • पोलिसांनी त्यांचा मास्क दररोज बदलणे गरजेचे आहे. जर ते कापडाचा वापरत असतील तर तो कपडय़ांबरोबरच गरम पाण्यात भिजत टाकावा.
  • ज्यांना उच्च रक्तदाब, मधुमेह अशा प्रकारचे आजार आहेत त्यांनी एकदा आपल्या डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.
  • जास्तीत जास्त पाणी प्या. शरीरातील पाणी कमी झाले तर रोगप्रतिकारशक्ती कमी होते. दिवसातून साडेतीन लिटर पाणी प्यायलाच हवे.
  • कपडय़ांबरोबर आपले शूजही कोरोनाचा वाहक ठरू शकतात, अशा वेळी शूज घराच्या बाहेर काढावे आणि त्यावरही सॅनिटायझर शिंपडावे.
आपली प्रतिक्रिया द्या