तुम्हीही गुडघे वर करून झोपता? सावधान; होऊ शकतात ‘हे’ गंभीर परिणाम

आपण अनेकवेळा झोपेत नकळत गुडघे वर करून झोपतो. ही स्थिती जास्त वेळ राहिली तर गुडघ्याखालील पायाच्या भागांना रक्तपुरवठा कमी प्रमाणात होईल आणि त्यामुळे पायांना मुंग्या येणे किंवा पाय दुखणे हे प्राथमिक स्तरांवरचे त्रास उद्भवू शकतात.

गुडघे वर करून थोड्या वेळ पडून राहिल्याने काही लोकांना बरे वाटते. मात्र बरे वाटते म्हणून जास्त वेळ तसेच पडून राहू नये. यामुळे शरीरावर वाईट परिणाम होतात. आजाराला आमंत्रण द्यायचे नसल्यास आहार, व्यायाम आणि झोप हे तीन खांब सांभाळून ठेवा. झोप ही निरोगी शरीरास औषधी सारखे असते आणि नीट झोपणे हे गरजेचे आहे.

आपले शरीर सतत कार्यरत असते, त्यातील एक महत्वपूर्ण काम रक्त शुद्धीकरण आहे. त्यासाठी रक्त वाहिन्या डोक्यापासून पायापर्यंत आपण झोपलेले असतांनाही काम करत असतात. कुठल्या शारिरीक स्थिती मुळे रक्तप्रवाह सुरळीत होत नसेल तर सुरुवातीला थोडा त्रास जाणवेल आणि सुधारणा न झाल्यास नंतर शारिरीक व्याधीत रूपांतर होते.

कुशी वर झोपणे सर्वात उत्तम. लहानपणीच ही सवय लावली तर आरोग्य चांगले ठेवण्यास मदत होते. मोठेपणी थोडा वेळ लागेल पण चांगल्या सवयी कधीही अंगीकृत करता येतात. कोरा (quora) या प्रश्न उत्तरांच्या एका संकेतस्थळावर विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देत असताना चित्रा अभ्यंकर यांनी ही माहिती दिली.

आपली प्रतिक्रिया द्या