प्लुटोच्या पृष्ठभागावर हृदय कुणी कोरलं…

पृथ्वीपासून खूप दूर असलेल्या प्लुटो ग्रहाच्या पृष्ठभागावर दिसणाऱया हृदयाचे रहस्य अखेर उलगडले आहे. नासाच्या यानाने प्लुटोभोवती फिरताना काही पह्टो घेतले होते.

त्यामध्ये प्लुटोच्या पृष्ठभागावर हृदयाचा आकार दिसला होता. शास्त्रज्ञांनी त्याला ‘टॉम्बॉक रेजिओ’ असे नाव दिले होते. 2015 पासून प्लुटोच्या पृष्ठभागावरील हृदयाचे रहस्य उलगडण्याचा शास्त्रज्ञांचा प्रयत्न आहे. अखेर त्याला यश मिळाले आहे. शास्त्रज्ञांच्या मते एका मोठय़ा प्रलयकारी घटनेमुळे हे हृदय निर्माण झालेय. अंदाजे 435 मैल व्यासाची एक उल्का प्लुटोवर आदळली असावी. त्यामुळेच हा आकार निर्माण झाला.

टॉम्बॉक रेजिओचा हलका रंग नायट्रोजनयुक्त बर्फामुळे आहे, असा शोध शास्त्रज्ञांनी लावला आहे