
दिल्लीतील एम्स रुग्णालयातील डॉक्टरांनी आईच्या पोटात असलेल्या बाळाची हृदय शस्त्रक्रिया यशस्वी केली आहे. डॉक्टरांनी बलून डाइलेशन शस्त्रक्रिया करून मुलाच्या हृदयाची बंद झडप उघडली. विशेष म्हणजे डॉक्टरांनी अवघ्या 90 सेपंदांत ही शस्त्रक्रिया पूर्ण केली. आई आणि तिच्या गर्भातील बाळ हे दोघेही सुखरूप आहेत.

























































