पाऱ्याची छत्तिशी! मुंबईकर घामाघूम, तापमानाचा यंदाच्या हंगामातील उच्चांक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईतील कमाल तापमानाने रविवारी यंदाच्या हंगामातील उच्चांकी पातळी गाठली. दोन दिवसांपूर्वी 34 अंशांवर राहिलेल्या पाऱ्याने तब्बल 35.9 अंशांवर उसळी घेऊन मुंबईकरांना चांगलाच घाम फोडला. सुट्टीचा दिवस म्हणून फिरण्यासाठी घराबाहेर पडलेले मुंबईकर या तापमानवाढीमुळे सायंकाळी हाश-हुश्श करतच घरी परतले.

कुलाबा वेधशाळेकडील नोंदीनुसार सांताक्रुझमध्ये कमाल 35.9 तर किमान 24.2 अंश इतके तापमान नोंद झाले. कमाल तापमानात सरासरीपेक्षा दोन अंशांची वाढ झाली. पावसाचा मुक्काम वाढल्यामुळे मुंबई शहर व उपनगरात पाऱयाने आपला ‘तप्तावतार’ दाखवायला सुरुवात केली नव्हती. रविवारी मात्र पाऱयाने आपली छत्तिशी दाखवून मुंबईकरांना घामाघूम केले.

सुट्टीच्या आनंदावर पाणी
सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी घराबाहेर पडलेली कुटुंबे तसेच निवडणूक प्रचारासाठी उमेदवारांसोबत फिरलेले कार्यकर्ते यांनी पाऱयाच्या छत्तिशीची ही डोकेदुखी सहन केली. मुंबईतील रविवारचे तापमान हे राज्यातील इतर प्रमुख शहरांच्या तुलनेत अधिक होते.