
संयुक्त राष्ट्राच्या एका अहवालानुसार वर्ष 2015 ते 2019 या पाच वर्षांत पृथ्वीवर सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे. गेल्या पाच वर्षांत उष्णतेचा कहर पृथ्वीवासियांना सोसावा लागला आहे. संयुक्त राष्ट्राच्या ‘युनायटेड इन सायन्स’ या अहवालात 2011 ते 15 च्या तुलनेत पुढील पाच वर्षात तापमानात 0.2 डिग्री सेल्सिअस इतकी वाढ झाली आहे. सध्या जागतिक तापमान वर्ष 1850 ते 1900 च्या तुलनेत 1.1 डिग्री सेल्सिअस इतके वाढल्याचेही या अहवालात म्हटले आहे. गेल्या 40 वर्षात अंटार्कटिक खंडावरील बर्फ विरघळण्याचे प्रमाण 12 टक्के होते. 2015-19 दरम्यान या प्रमाणात आणखी वाढ झाली आहे. पृथ्वीवरील कार्बनडाय ऑक्साईडचे प्रमाणही कमी होण्याऐवजी 2018 मध्ये 2 टक्क्यांनी वाढल्याचे संयुक्त राष्ट्र संघाचे महासचिव एंटोनियो गुटेरस यांनी स्पष्ट केले.




























































