पश्चिम महाराष्ट्राला पुन्हा अतिवृष्टीचा इशारा

1631

भीषण पुरातून सावरत असलेल्या पश्चिम महाराष्ट्राला हवामान खात्याने पुन्हा धडकी भरवली. पुढील दोन दिवसांत कोल्हापूर, सातारा, पुणे जिल्ह्यातील घाटमाथ्यावर मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होईल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. काही दिवसांपूर्वी हवामान खात्याच्या अतिवृष्टीच्या इशाऱयाला गांभीर्याने न घेणारे प्रशासन आता या नव्या इशाऱ्यानंतर सतर्क झाले आहे.

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने पश्चिम किनारपट्टी, घाटमाथा आणि मध्य महाराष्ट्रात येत्या दोन दिवसांत पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान खात्याने आज दुपारी व्यक्त केला. रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिह्यातही काही ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता असून विदर्भातील गडचिरोली, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया या जिह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या