पावसाच्या ‘हजेरी’ने आठवड्याच्या पहिल्याच दिवशी ‘लेटमार्क’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

रविवारी रात्रीपासूनच पावसानं जोर धरल्यानं मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यांमधील वाहतूक जनजीवनावर त्याचा परिणाम पाहायला मिळतो आहे. मुसळधार पावसामुळे मध्य, हार्बर, पश्चिम रेल्वे मार्गावरील वाहतूक २०-२५ मिनिटे उशिराने सुरू असून विद्यार्थी आणि नोकरदारवर्गाच्या आठवड्याची सुरुवात लेट मार्कनं झाली आहे.

मुसळधार पावसामुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक २० ते २५ मिनिटे उशिराने सुरू असून सकाळी मुंबईकडे जाणाऱ्या रणकापूर एक्सप्रेस, वलसाड आणि फ्लाईंगराणी या लांब पल्याच्या गाड्या उशिराने धावत आहेत. तर डहाणू चर्चगेट लोकल ही २० ते २५ मिनिटे उशिराने धावत आहेत.