मुक्कामी पावसाने बीड जिल्ह्याला धुतले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उदय जोशी । बीड

बीडमध्ये शुक्रवारी दिवसभर सुरू असलेल्या पावसानं आजही मुक्काम कायम ठेवला आहे. आज पहाटे बीड जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला. जिल्ह्यातील बहुतांश भागात पावसाने दमदार सुरुवात केली आहे.

मृग नक्षत्र आणि मान्सून पाऊस हे शेतकऱ्यासाठी शुभसंकेत मानले जातात. शुक्रवारी दिवसभर परळी, आबाजोगाई, केज, धारूर भागात रिमझिम सरींनी झोडपल्यानंतर मुक्कामी थांबलेल्या या पावसाने बीड जिल्ह्यातील बहुतांश भागात चांगली बॅटिंग केली, पहाटे दोन तास लावलेल्या हजेरीने ओढे नाले भरून वाहू लागले, मध्यरात्री नंतर पावसाचा वेग वाढल्याने बहुतांश भागातील वीज पुरवठा खंडित झाला होता.