चंद्रपूरमध्ये तुफान पाऊस, इरई धरणाचे सात दरवाजे उघडले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । चंद्रपूर

विदर्भात चंद्रपुरातही तुफान पाऊस पडला असून चंद्रपूरच्या इरई धरणाचे 7 दरवाजे उघडले आहे. धरणात सध्या 97 टक्के पाणीसाठा असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

चंद्रपूर शहर आणि जिल्ह्यात पावसाची संततधार सुरूच आहे. याचा परिणाम सर्वच जलसाठ्यांच्या पातळीत वाढ झाली आहे. शहरालगत इरई  धर धरणाचे 7 दरवाजे उघडले आहेत. धरणाची 7 दारे 2.5 मीटरने उघडले आहेत. धरणात 97 टक्के पाणीसाठा असून तो नियंत्रित रहावा यासाठी दारे उघडली गेली आहेत.

किटाळी, भटाळी आणि नदीकाठच्या सर्वच गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. धरणाच्या खालच्या भागात असलेल्या पारोधी आणि काही अन्य गावात पुराचे पाणी  शिरले आहे. वेगाने येणारे पाणी शहराला वळसा घालून वर्धा नदीत समाविष्ट होते. मात्र त्याआधी शहरातील काही भागात हे पाणी शिरण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने प्रशासन आणि आपत्ती निवारण यंत्रणा सज्ज आहे.