उर्ध्व गोदावरी खोऱ्याच्या दारणा गंगापूर धरणक्षेत्रात दमदार पाऊस

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । कोपरगांव

कोपरगांव उर्ध्व गोदावरी खो-यातील दारणा गंगापूर धरण कार्यक्षेत्रात दमदार पावसाने हजेरी लावली असून धरणांत पाणीसाठा वेगाने जमा होत आहे.

२५ जुन रोजी पडलेल्या पावसाची आकडेवारी मिलीमिटर मध्ये तर कंसातील आकडेवारी एकुण झालेल्या पावसाची आहे. दारणा ९१ (१९० ) घोटी १०९ (२४६ ) त्र्यंबकेश्वर ११२ (१६३ ) गंगापुर ९५ (१५६ ) नांदुर मध्यमेश्वर ३४ (४६ ) देवगांव २६ (११० ) ब्राम्हणगांव ९ (२०१ ) महालखेडे १७ (१८५ ) कोपरगांव ७ (१७४ ) पढेगांव ७ (१८८ ) सोनेवाडी १० (११५ ) कोळगांव ६ (१४२ ) सोनेवाडी ७ (२५४ ) शिर्डी ८ (२४८ ) राहाता ६ (१६१ ) रांजणगांव खुर्द ४ (८१ ) चितळी ० (११५ ) याप्रमाणे पाउस झाला. गोदावरी नदीला अजुन वाहते पाणी आलेले नाही. २१ जुन रोजी कोपरगांव तालुक्यात दमदार पाउस झाल्यांने काही शेतक-यांनी खरीप पीकाच्या पेरण्या हाती घेतल्या आहेत तर काही ठिकाणी अजुनही चांगल्या पावसाची शेतक-यांना प्रतिक्षा आहे.