रत्नागिरीत पुढील दोन दिवस जोरदार पावसाचा अंदाज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
monsoon-in-maharashtra

कोकणसह किनारपट्टीच्या भागात पुढील दोन दिवस पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मॉन्सूनचा परतीचा प्रवास सुरू असून दोन दिवस राज्यातील काही भागात जोरदार सरी कोसळण्याची शक्यता आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार 12ऑक्टोबर ते 14ऑक्टोबरदरम्यान रत्नागिरी जिल्हयात काही ठिकाणी 30-40 प्रति तास वेगाने वारे वाहण्यासह व विजेच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. जनेतेने सुरक्षितता बाळगावी आणि योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केला आहे.