
सामना ऑनलाईन, राळेगाव
वर्धा जिल्ह्याला परतीच्या पावसाने झोडपून काढला आहे. जिल्ह्यात गेल्या दहा तासापासून पाऊस होत असून या पावसामुळे नदीनाले ओसंडून वाहायला लागले आहे. या पावसामुळे यशोदा नदीला पूर आला असून राळेगाव – वर्धा हा राज्यमार्ग वाहतुकीसाठी रात्री बारा वाजतापासून बंद करण्यात आला आहे. या नदीकाठावरील शेकडो हेक्टरवरची शेती पाण्याखाली आली आहे. पंधरा दिवसानंतर झालेल्या पावसामुळे पिकाला नवसंजीवनी मिळाली असून शेतकरी खूश झाला आहे.





























































