मान्सूनच्या पहिल्याच मुसळधार सरींनी मालवणला झोडपले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मालवण

तळकोकणात दाखल झालेला मान्सून शुक्रवारी दमदार बरसला. मान्सूनच्या पहिल्याच मुसळधार सरींनी सिंधुदुर्गात मालवणला झोडपून काढले. दिवसभर सतत कोसळलेल्या पावसामुळे मालवणचे जनजीवन विस्कळीत बनले होते.

दरम्यान पावसाचा हा जोर सोमवार पर्यंत कायम राहील असा अंदाज हवामान विभाग तज्ञ दिनेश मिश्रा यांनी व्यक्त केला आहे.

शुक्रवारी सकाळी मुसळधार पावसाने मालवणला झोडपले. त्यानंतर पावसाची संततधार सुरूच होती. शहरातील काही सखल भागात पाणी साचले. ग्रामीण भागात तर धुव्वाधार पावसामुळे बळीराजा सुखावला असून शेतीच्या कामांना वेग आला आहे.

तीन दिवस मुसळधारची शक्यता
कोकण किनारपट्टीवर १० जून पर्यंत मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर किनारपट्टीवर वाऱ्यांचाही वेग वाढणार असल्याचा संदेश सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनास प्राप्त झाला आहे.