
मान्सून अधिकृतपणे देशातून माघारी फिरल्याची घोषणा हवामान खात्याने करताच बुधवारी सायंकाळी आलेल्या परतीच्या पावसाने गोव्याला झोडपून काढले. विजांचा लखलखाट, ढगांचा गडगडाट करत वादळी वाऱ्यासह आलेल्या परतीच्या पावसाने गोव्याला झोडपून काढले.
राजधानी पणजीमधील अनेक रस्ते दीड तास झालेल्या मुसळधार पावसामुळे जलमय झाले होते. वादळी वाऱ्यामुळे काही ठिकाणी झाडे, वीजेचे खांब पडून नुकसान झाले. चार वाजता सुरु झालेल्या मुसळधार पावसाने जवळपास दोन तास धुमाकूळ घातला.

हवामान खात्याने मान्सून देशातून अधिकृतपणे माघारी फिरल्याचे जाहीर केले. गेले काही दिवस राज्यात ठीकठिकाणी परतीचा पाऊस पडत आहे. काल म्हापशात गारांसह जोरदार पाऊस पडला होता.
























































