जालन्यातील कुंभारझरी भागाला वादळी पावसाने झोडपले, शेतीचे प्रचंड नुकसान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
sugarcane-farm

जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यातील कुंभार, झरीसह परिसरात ब्रम्हपुरी, काळेगाव, खानापूर, सावरगांव, डोलखेडा, काचनेरा आदी भागामध्ये ऊस पिकाचे मोठ्या प्रमाणात उत्पन्न घेतात. मागील महिन्यात अतिवृष्टी झाली, त्यातून सावरत काही दिवस विश्रांती दिल्यानंतर 5 सप्टेंबर रोजी सायंकाळी पुन्हा खूप मोठया प्रमाणात वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्याने, कुंभारझरीसह परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची शेतं भुईसपाट झाल्याचे चित्र दिसले.

कुंभारझरी मंडळात अनेक शेतकऱ्यांच्या शेतात ऊस पूर्ण पणे भुईसपाट झाल्याचे दिसते. यामुळे मोठे नुकसान झाले असून या भागात ऊस उत्पादनात खूप मोठ्या प्रमाणात घट येणार. तसेच खूप मोठ्या आर्थिक संकटाला सर्वांना समोर जावे लागणार आहे. या परिसरातील शेतकरी आर्थिक संकटामुळे चिंताग्रस्त झाला आहे, तरी शासनाने इतर पिकांसोबत ऊस पिकांचे सुद्धा पंचनामे करण्याचे आदेश देऊन नुकसान भरपाई ध्यावे. अशी मागणी कुंभारझरी व परिसरातील शेतकऱ्यांकडून जोर धरू लागली आहे.