
अमेरिकेतील उत्तर पूर्व भागात बर्फवृष्टीने धुमशान घातले आहे. या बर्फवृष्टीमुळे जनजीवन ठप्प झाले आहे. 10 हजारांहून अधिक उड्डांणे रद्द करावी लागली असून लाखो लोकांना घराबाहेर पडणेही मुश्किल झाले आहे.
न्यूयॉर्क, बोस्टन, न्यू जर्सी, फिलाडेल्फिया या शहरांमध्ये आणीबाणी जाहीर केली आहे. वीजकपात आणि बर्फवृष्टीमुळे लोकांनी घरातच थांबावे, अशा सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.
रोड आयलँडच्या वारविकमध्ये तर तीन फुटांहून अधिक बर्फ साचला आहे. संयुक्त राष्ट्राला आपली सुरक्षा परिषदेची बैठक स्थगित करावी लागली. न्यूयॉर्क शहरात सहा वर्षांत पहिल्यांदा शाळा बंद ठेवाव्या लागल्या.




























































