वैष्णोदेवी यात्रेत आता हेल्मेटसक्ती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । जम्मू

कटरा येथील माता वैष्णोदेवीची यात्रा घोडय़ावर बसून पूर्ण करणाऱया भाविकांना आता हेल्मेट घालणे बंधनकारक करण्यात आले आहे. मंदिर समितीने आज तसे आदेश जारी केले. गेल्या काही महिन्यांत यात्रा मार्गावर अनेक अपघात झाले. त्यामुळेच भाविकांच्या सुरक्षिततेसाठी मंदिर समितीने हेल्मेटसक्तीचा निर्णय घेतला आहे. घोडा किंवा खेचरावर स्वार होणाऱया भाविकाला डोक्यावर हेल्मेट आणि गुडघा व हाताला गार्ड घालूनच यात्रा पूर्ण करावी लागणार आहे.