
कोरोनाच्या कडक निर्बंधांमुळे नाटय़गृह बंद आहेत. त्यामुळे कलाकार आणि रंगमंच कामगार यांच्या मदतीसाठी अभिनेता श्रेयस तळपदे याने एक विशेष उपक्रम सुरू केला आहे. ‘नाईन रस’ अॅप डाऊनलोड करा आणि मदत करा, असे आवाहन त्याने केले आहे.
गेल्या वर्षी लॉकडाऊनमध्ये श्रेयसने त्याचे ओटीटी प्लॅटफॉर्मवर ‘नाईन रस’ अॅप सुरू केले होते. हा ओटीटी प्लॅटफॉर्म मराठी, इंग्रजी, हिंदी आणि गुजराती भाषेत उपलब्ध असून त्यावर नाटक, लाइव्ह परफॉर्मन्सेस, कथाकथन तसेच स्टँडअप शो बघता येतात. श्रेयसने स्टेज आर्टिस्टना या परिस्थितीत काहीतरी हातभार मिळावा यासाठी हा उपक्रम सुरू केला होता. पण आता पुन्हा एकदा रंगमंच कलाकार आर्थिक अडचणीत आहेत. ‘नाईन रस’ या अॅपवर क्लब तसेच ग्रुप एकत्र जॉइंट स्क्रीन प्ले करू शकतात तर त्यासाठी सप्सक्रिप्शन भरावे लागणार आहे. यामुळे घरी बसूनच नाटकांचा आनंद घेता येणार आहे. यातून मिळणारी मोठी रक्कम ही कलाकार तसेच अन्य रंगकर्मी यांना जाणार आहे. तर उरलेली रक्कम ही अन्य गरजू स्टेज कलावंतांना दिली जाणार आहे.
याविषयी श्रेयस म्हणाला, ‘‘आम्ही ‘नाईन रस’ ही संकल्पना मागील वर्षी स्टेज आर्टिस्टना मदत करण्याच्या हेतूने आणली होती. पण या वर्षी पुन्हा एकदा हे सगळे कलाकार त्याच समस्येला सामोरे जात आहेत. त्यामुळे ‘नाईन रस’च्या टीमने पुन्हा एकत्र येत कलाकारांसाठी काहीतरी करण्याचा निर्णय घेतला आहे.

































































