बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात धावली हायस्पीड रेल्वे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात बुधवारी हायस्पीड रेल्वे धावली. आष्टीकरानी रल्वे पहाण्यासाठी गर्दी केली होती. नगर बीड परळी रेल्वे मार्गावरील नगर ते आष्टी या 61 किलोमीटर अंतरावर बारा डब्यांची रेल्वेची चाचणी घेण्यात आली.

नगर ते आष्टी या 61 किलोमीटर अंतरावर पहिल्यांदा हाय स्पीड रेल्वे धावल्याने बीड जिल्ह्यातील नागरिकांचे रेल्वेचे स्वप्न अखेर पूर्ण होत असताना दिसत आले. रेल्वे बीड व परळीपर्यंत कधी धावणार अशी चर्चा सुरू आहे. नगर बीड परळी या रेल्वे मार्गाला 1995 साली तत्वतः मान्यता मिळाली होती.

नगर ते आष्टी या 61 किलोमीटर अंतरावरील लोहमार्गाचे काम पूर्ण झाले आहे. नगर ते आष्टी या 61 किलोमीटर अंतरावर बुधवारी हाय स्पीड रेल्वे (ताशी 144 किलोमीटर) बारा डब्यांसह धावली. आष्टी तालुक्यातील सोलापूरवाडी व कडा येथील रेल्वे स्थानकावर नागरिकांच्या वतीने दक्षिण मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे स्वागत केले. यापूर्वी 17 मार्च 2018 रोजी नगर ते नारायणडोह दरम्यान सात किलोमीटरवर सात डब्यांच्या रेल्वेची चाचणी घेण्यात आली. 25 फेब्रुवारी 2019 रोजी नारायणडोह ते सोलापूरवाडी या 15 किलोमीटर अंतरावर सात डब्यांची रेल्वे चाचणी घेण्यात आली असून 9 डिसेंबर 2021 रोजी दोन डब्यांची रेल्वेची चाचणी आष्टीपर्यंत घेण्यात आली होती. बुधवारी बारा डब्यांची रेल्वे सोलापूरवाडी ते आष्टी 31 किलोमीटर अंतरावर (ताशी 144 किलोमीटर) हाय स्पीड रेल्वे धावली. रेल्वे पाहण्यासाठी सोलापूरवाडी, धानोरा, कडा या ठिकाणी नागरिकांनी गर्दी केली होती