
डॉ. आनंद तेलतुंबडे यांच्या परदेशवारीला उच्च न्यायालयाने बुधवारी नकार दिला. लेक्चर ऑनलाईन देता येईल, अशी सूचना न्यायालयाने डॉ. तेलतुंबडे यांना केली.
यूके व ऍम्स्टरडॅम येथील काही विद्यापीठांत लेक्चर देण्यासाठी डॉ. तेलतुंबडे यांना निमंत्रण देण्यात आले आहे. या परदेश दौऱयाला परवानगी मिळावी म्हणून डॉ. तेलतुंबडे यांनी याचिका दाखल केली होती. न्या. अजय गडकरी व न्या. रणजितसिंह भोसले यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. तुम्ही ऑनलाइन लेक्चर देऊ शकता, अशी सूचना करत न्यायालयाने यास नकार दिला. अखेर डॉ. तेलतुंबडे यांनी याचिका मागे घेतली.
एनआयएचा विरोध
डॉ. तेलतुंबडे एल्गार परिषेदत आरोपी आहेत. ते फरार होण्याची शक्यता आहे. तेव्हा त्यांच्या या दौऱयाला परवानगी देऊ नये, असा युक्तिवाद राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) केला.