रहिवासी इमारतीत अनधिकृत रुग्णालय नियमित करण्याचा घाट! सहाय्यक आयुक्तांना हायकोर्टाचा दणका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रहिवासी इमारतीत अनधिकृतपणे सुरू असलेले रुग्णालय नियमित करण्याचा घाट घालणाऱया ठाणे पालिकेच्या सहाय्यक आयुक्तांना मुंबई उच्च न्यायालयाने चांगलाच दणका दिला. न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी नौपाडा-कोपरी प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त महेशकुमार जामनोर यांच्या विरोधात अवमानाची कारवाई करत न्यायालयाने त्यांना प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले.

न्यू देवाशीष को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीने याप्रकरणी याचिका दाखल केली. यावर आज न्यायमूर्ती रवींद्र घुगे व न्या अभय मंत्री यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. जामनोर यांनी संबंधित अनधिकृत रचना तपासून 15 फेब्रुवारीपर्यंत आवश्यक कारवाई पूर्ण केली जाईल, असे आश्वासन दिले होते. तथापि न्यायालयीन आदेशाचे कोणतेच पालन करण्यात आले नाही. त्यामुळे न्यायालयाने त्यांना नोटीस बजावली.