उच्चभ्रू वस्तीत घरफोड्या करणारी दुकली जेरबंद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
thief-ran-jail

संधी मिळेल तेव्हा इमारतीत घुसून बंद घरात चोऱ्या करणारी दुकली मलबार हिल पोलिसांच्या हाती लागली. राजपाल (नाव बदललेले) हे मलबार हिल परिसरात राहतात. घर बंद करून ते बाहेर गेले असता त्यांच्या घराचे लॉक तोडून रोख रक्कम व सोन्याचे दागिने चोरल्याची घटना घडली.

या प्रकरणी राजपाल यांनी मलबार हिल पोलीस ठाण्यात तक्रार दिली. वरिष्ठ निरीक्षक नीलकंठ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय तुकाराम डिगे व पथकाने परिसरातील सीसीटीव्ही तपासून मिळालेल्या माहितीवरुन नालासोपारा येथून इब्राहिम बद्रुद्दीन शेख (35) आणि सिद्धू राजपूत (30) या दोघांना पकडले. त्यांच्याकडून चोरलेले सोन्याचे कॉईन हस्तगत केले.